Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा आकडा वाढताच, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

 राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) जोर वाढताच आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे.

Updated: Jan 5, 2022, 09:21 PM IST
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा आकडा वाढताच, ओमायक्रॉनचे रुग्ण किती? title=

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) जोर वाढताच आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येतही (Omicron Cases in Maharashtra) वाढ होत आहे. राज्याचा दिवसभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 26 हजार पार गेला आहे. तसंच ओमायक्रॉनचेही 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. (maharashtra today 5 january 2022 corona 26 thousand 538 positive patients and 144 omicron cases found) 

राज्यात दिवसभरात 26 हजार 538 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात 5 हजार 331 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या मृत्यूदर हा 2.09 टक्के इतका आहे.

मुंबईत किती कोरोना रुग्ण? 

मुंबईतही कोरोनाचा जोर पाहायला मिळतोय. मुंबईत कोरोनाचे 24 तासात 15 हजार 166 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 714 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

राज्यात 144 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधक रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. मुंबईत 100 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.