मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

CM Eknath Shinde : या घटनेनंतर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: May 13, 2023, 11:51 AM IST
मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग title=

CM Eknath Shinde : सातारा (Satara) दौऱ्यावर जात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये (CM Helicopter) बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा येथे काही कामानिमित्त जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरने तांत्रिक बिघाड झाला. खबरदारीचा उपाय म्हणूनत तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडला नाही. यानंतर हा दौरा मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.

मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते पुन्हा राजभवन येथे उतरवण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसाठी दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध करुन देणअयात आले आहे. या सर्व प्रकारानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. हेलिकॅाप्टरच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो बंद पडला आणि त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवण्यात आले. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता साताऱ्याला जाऊ शकणार नाहीत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात शिवसेना पक्ष मजबूत करण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत सरकार कायम राहणार असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच 16 आमदारांच्या सदस्यतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील आमदारांचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तसेच पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग जो काही निर्णय घेईल तो स्वीकारावा लागेल, त्यामुळे आम्हाला सांगायचे आहे की, निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला होता, यामुळे आम्हीच खरे शिवसेना आहोत, असेही शिरसाट म्हणाले.