धावत्या ट्रेनसमोर उडी मारून युवकाची आत्महत्या

Updated: Jun 24, 2018, 02:49 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये कुर्ला स्थानकात एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं सीसीटीव्ही फूटेज हाती आलंय. २२ जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. अतिशय वेगात एक्सप्रेस येत असताना या व्यक्तीनं रुळावर उडी घेतली.काही दिवसांपूर्वी मालाडमध्येही एका तरुणानं लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे.