मुंबई : राज्यात ओमायक्रॉनची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यात एका दिवसात 1,179 कोरोनाबाधित सापडलेत... त्यामुळे आता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे...
1. राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत संकेत दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाईट कर्फ्यूवर चर्चा करण्यात आली आहे.
2. देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता निर्माण झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत विधानसभेत संकेत दिले. मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा झाली. आज यासंदर्भात नियमावली जाहीर होणयाची शक्यता आहे.
3. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाल आहे. यासाठी राज्यात आणखी नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य कोविड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला...त्यामुळे वाढती रुग्णसंख्या वेळीच रोखण्यासाठी खबरदारीने पावलं उचलण्यावर चर्चा झाली...
4. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त होत असतानाच आज केंद्र सरकारनं सर्वच राज्यांसाठी अलर्ट जारी केलाय. यात नाईट कर्फ्यू आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले गेलेत. त्यानुसार मध्य प्रदेश सरकारनं लगेचच मोठा निर्णय घेतला असून राज्यात पुन्हा एकदा नाइट कर्फ्यू लावण्यात आलाय. याबाबत खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माहिती दिली.
5. राज्यात ओमायक्रॉनचे नवे 23 बाधित आढळलेयत...रुग्णसंख्येत वाढ झाली असून, राज्यात एका दिवसात 1,179 कोरोनाबाधित सापडलेत...तर राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनाने 19 जणांचा बळी घेतलाय...मुंबईतही रुग्णसंख्या वाढलीय...24 तासांत कोरोनाच्या 602 बाधितांची नोंद झाली...तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय..
6. सध्या देशातील उत्तरेकडील राज्यात थंड वाऱ्याच्या लहरी वाहत असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानात घट झालीय. वाशिम जिल्ह्यातही तापमानाचा पारा 13 सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने जिल्ह्यात हुडहुडी भरलीय.थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या करून ऊब घेण्यात येतेय..
7. मध्य रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर एसी लोकलच्या तब्बल 80 फेऱ्या वाढणार आहेत...मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध केली जातेय...तसंच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मध्य रेल्वेकडून गती दिली जातेय...
8. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज कामकाज सल्लागार समितीची सकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशन पुढे किती दिवस घ्यायचे कामकाज काय करायचे यावर महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या चर्चा होणारेय. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या संदर्भातही आज चित्र स्पष्ट होणारेय..
9. पुण्यातील सारसबाग इथल्या श्री सिद्धिविनायकाला थंडी वाढली की लोकरीचा स्वेटर, कानटोपी घातली जाते. यंदाही असा पोषाख करण्यात आलाय. पुणेकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या लोकरीच्या पोषाखातील सिद्धिविनायकाचं आकर्षण आहे.सारसबाग सिद्धिविनायक मंदिर किंवा तळ्यातला गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे.