महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले, सोसायटीत लसीकरण

किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या महापौर दालनाबाहेरील आंदोलनावरुन भाजपला फटकारताना केंद्राला डिवचले.  

Updated: May 6, 2021, 12:48 PM IST
महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले, सोसायटीत लसीकरण
Pic / ANI

 मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) धोका ओळखून मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) गतवर्षीच स्वत:ची यंत्रणा उभी केली. त्यामुळे आज कोरोनाविरुद्धच्या लढ्यात चांगले काम करता येत आहे.  याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत स्तुती केली आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar ) यांनी केली. त्याचवेळी त्यांनी भाजपला चांगलेच फटकारले. भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले. कालच्या भाजपच्या महापौर दालनाबाहेरील आंदोलनावरुन भाजपला फटकारताना केंद्राला डिवचले. केंद्राचीच कानउघाडणी झाली आहे, तर इतरांनी तो धडा घ्यावा. काल भाजपने कल्पना दिली असती तर मी महापौर दालनात आले असते निवेदन घेतले असते. खासगी रुग्णालय लस विकत घेत आहेत. त्यातले 150 रुपये हे केंद्राला जात आहेत. हे पैसे घेऊ नका, असं तुम्ही केंद्राला सांगा. आपण सगळेच जाऊ दिल्लीला. आंदोलन कसले करता, असे भाजपला फटकारले. (Mayor Kishori Pednekar strongly criticized on central government at Mumbai )

केंद्र सरकारला फटकारले, मुंबईची स्तुती 

कोरोनाची परिस्थिती हातळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे तर मुंबईची स्तुती केली आहे. यावर त्या म्हणाल्या गेल्यावर्षी मार्च महिन्यात सगळं जग संभ्रमात होते. तेव्हाच मुंबई महापालिकेने स्वतःची अशी यंत्रणा सुरु केली. पहिलं विलगीकरण सेंटर एनएससीआयला सुरू केले. हळूहळू जम्बो कोविड सेंटर सुरू केले. 12 कोटी वर लसी मागितल्या आहेत. पण केंद्राकडून डोस कमी येत आहे, असे त्या म्हणाल्या. 

एक रकमी पैसे द्यायला तयार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लस मोफत देण्यापेक्षा लस मुबलक द्या. सध्या अनेक केंद्र बंद आहेत. जसजसं केंद्रातून लस येईल तसंतसं इथे दिली जात आहे. नागरिकांना तसे कळवलं जात  आहे.  नागरिक 2000 जातात आणि केंद्रांवर 500 च लसी असतात. लोक उगाच अफवा पसरवतात. कोविन अॅपच्या माध्यमातून मेसेज आला असेल तरच या, नाहीतर गर्दी करू नका, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले.

सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण करणार

 सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार आहे. पण तिथे पुरेशी जागा असली पाहिजे, त्याठिकाणी कार्डिअक ऍम्ब्युलन्स व्यवस्था ठेवता आली पाहिजे अशाच ठिकाणी लसीकरण करू त्याआधी सोसायटीमध्ये जाऊन पाहणी केली जाईल. मात्र हे लस मुबलक प्रमाणात आल्या तरच शक्य होईल. टेस्टिंग वाढवल्या, गर्दी कमी केली, कंटेन्मेंट झोन केले, लॉकडाऊन हळूहळू वाढवतोय , बेड व्यवस्थापन केलं, वॉर रूममधून मदत केली आहे. सर्व निट सुरु आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याने अडचण येत आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, केंद्राकडून करण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटकमधील सरकारने रोखल्याने त्यावर भाष्य करत टीका केली. बाहेरच्या बाहेर ऑक्सिजन पळवत असतील तर ड्रीम कॉरिडॉरच्या माध्यमातूनच आपल्याला आणावा लागेल आणि आता ते तसं होत आहे. माहीम लसीकरण केंद्राबाहेर दादागिरी होत आहे, यात लक्ष घालून कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.