close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#METOO : नाना पाटेकर गुन्हा, पोलिसांचे सावधगिरीचं पाऊल

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलंल आहे.

Updated: Oct 11, 2018, 08:32 PM IST
#METOO : नाना पाटेकर गुन्हा, पोलिसांचे सावधगिरीचं पाऊल

मुंबई : प्रत्यक्षदर्शींचे जबाब ऐकून अभिनेता नाना पाटेकर याला समन्स पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

#METOO : पोलीस दलालाही विळखा 

याबाबत प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जाणार आहे. हा प्रकार १० वर्षे जुना असल्याने पोलिसांनी सावधगिरीचं पाऊल उचललंय. २००८ ला हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झालेल्या विनयभंग प्रकरणी नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि समी सिद्दीकीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने बुधवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे. या चौघांविरोधात ३५४ आणि ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय गुन्हा नोंदविण्यात आलाय?

गुन्हा : स्त्रीला लज्जा वाटून तिला मानसिक धक्का बसावा या इराद्याने तिच्या अंगावर जाणे, बळजबरी करणे, स्त्रीला शीलभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा विनयभंग करणे
शिक्षेची तरतूद : ३ वर्षांच कैद आणि दंड, गुन्हा : लैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड, अंगविक्षेप करणे किंवा याच उद्देशाने एखादी वस्तू दाखवणे, एकांत स्थळी असताना लगट करणे., शिक्षेची तरतूद : शिक्षा १ वर्षापर्यंत कैद आणि दंड