Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?

Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात. 

Updated: Mar 10, 2023, 08:25 AM IST
Mhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?  title=
Mhada lottery announement mumbai and konkan housing latest Marathi news

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं स्वप्न जवळपास सगळेच बघतात. किंबहुना अनेकजण त्या एका स्वप्नपूर्तीसाठी जीव ओतून प्रयत्न करत असतात. मग ती नोकरी असो, एखादा व्यवसाय असो किंवा मग पैशांचं नियोजन असो. सारंकाही या घरासाठीच. या स्वप्नपूर्तीमध्ये त्यांना मदत होते ती म्हणजे MHADA ची. विविध ठिकाणी सोडत प्रक्रियेतून किमान दरांमध्ये म्हाडाकडून घरं (Mhada homes) उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये आजवर अनेकांनीच त्यांचं नशीब आजमावत स्वत:चं, हक्काचं घर मिळवलं आहे. काहीजण मात्र अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुंबईत घर मिळवायचंय? 

म्हाडाच्या अनेक सोडतींना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यातही मुंबई सोडतीवर (Mhada Mumbai Lottery) अनेकांचीच नजर. पण 2019 नंतक मागील वर्षाच्या सोडतीपर्यंत म्हाडाकडून फक्त तारखाच देण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षीही मार्च महिन्याची तारीख चुकण्याच्याच मार्गार आहे. त्यातच सोडतीत उपलब्ध असणाऱ्या घरांचा आकडाही म्हाडाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही, त्यामुळं मुंबई मंडळांच्या घरांसाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार हेच चित्र आता अधिक स्पष्ट होत आहे. 

मार्चमध्ये येणार होती सोडत... 

म्हाडाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापर्यंत मुंबई मंडळाची सोडत येणं अपेक्षित होतं. पण, मार्च सुरु होऊन पहिला पंधरवडाही आता संपण्याच्या मार्गी आहे, सोडतीचे संकेत मात्र मिळालेले नाहीत. वांद्रे वगळता इतर कोणत्याही विभागाची माहितीसुद्धा पुढे सादर करण्यात आलेली नाही. घरांच्या किमती आणि संख्याही अजून निर्धारित करण्यात आलेली नाही. त्यामुळं ही प्रक्रिया किती धीम्या गतीनं सुरु आहे हे लगेचच लक्षात येतंय. 

हेसुद्धा वाचा : Mhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

 

दरम्यान अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याअखेरीस म्हाडाच्या मुंबईतील घरांची सविस्तर माहिती आणि किमती निश्चित होतील आणि त्यानंतर जाहिरात, सोडतीचं काम हाती घेतलं जाईल. त्यामुळं मुंबईतील घराचं स्वप्न साकार होण्यासाठी आणखी वेळ दवडला जाणार हे मात्र नक्की. अर्थात हा वेळ तुम्ही आर्थिक नियोजनात लावल्यास घर घेताना अधिक गोष्टी सुकर होतील हेसुद्धा खरं.