चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Updated: Jan 16, 2019, 04:09 PM IST
चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या title=

मुंबई : नलासोपारा येथे चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुजेफ़ा नागोरी असे या मुलाचे नाव आहे. रश्मी रेसीडेन्सी या टॉवर मध्ये तो आपल्या कुटुंबासोबत रहात होता. काल रात्री दहा वाजता सोसायटीच्या गार्डनमध्ये व्यायामासाठी लावलेल्या पुलअपच्या रॉड गळफास लावून घेतला. हुजेफाच्या दप्तरात काही संशयास्पद  वहीची पाने सापडली आहेत. या वहीच्या पानांवर हुजेफाने काही चित्र रेखालटली असून काहीतरी लिहिले आहे. यावरून हुजेफाचा आत्महत्या करण्याचा मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचा समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्याने काढलेल्या चित्रात एक पंखा आणि त्याला  एक दोरी लटकलेली दिसत आहे. त्यामुळे हुजेफाचा सुरुवातीला घरात पंख्याला गळफास  घेण्याचे ठरवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच किती वाजता ही आत्महत्या करायची आणि कोणत्या विंग समोर करायची हे देखील लिहिण्यावरुन दिसून येत आहे. याच पानानावर ९.३० आणि ए विंग असा उल्लेख आहे. तर हुजेफाने    आत्महत्या ही ९.३० च्या सुमारास केली आहे. त्यामुळे  लहानग्या हुजेफाने  कश्या प्रकारे प्लान करून आत्महत्या केली आहे, हे समोर येत आहे.  

हुजेफाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.  सोसायटीच्या इतर लोकांनी त्याला लटकताना पाहील्यावर ही घटना समोर आली. हुजेफ़ा नालासोपारा येथील सेंट विदया मंदिर या शाळेत आठवित शिकत होता. तुलिंज पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. तर हुजेफाचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र हुजेफाच्या  आत्महत्येच कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.