मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुडीपाडवा मेळाव्यात आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. या फटकेबाजीचे जोरदार तडाखे राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना बसले. आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले. आजच्या (रविवार, १८ मार्च २०१८) भाषणात शिवाजी पार्कवरून काय म्हणाले राज ठाकरे?