मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या शहरांमध्ये देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूंचं प्रमाण ही जास्त आहे.
धारावीचा समावेश असलेल्या जी उत्तर विभाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. सुरूवातीला प्रथम क्रमांकावर असलेल्या वरळीचा समावेश असलेला जी दक्षिण विभाग ७ व्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वांद्रे पूर्वचा एच पश्चिम पहिल्या पाच हॉटस्पॉटमध्ये येतो. मुंबईतील सर्वच २४ वॉर्डमधील रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली आहे.
मुंबईतील 11 हॉटस्पॉर्ट
जी उत्तर - दादर, माहिम, धारावी- 2728 रुग्ण, 617 रुग्ण बरे झाले
ई विभाग- भायखळा , मुंबई सेंट्रल -- 2438 रुग्ण- 803 रुग्ण बरे झाले
पी उत्तर मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश - 2377 रुग्ण, 677 बरे झाले...
एल कुर्ला परिसराचा समावेश - 2321 रुग्ण, 510 रुग्ण बरे झाले -
एच पूर्व- वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ - (मातोश्री)- 2094 रुग्ण, 615 रुग्ण बरे झाले
के पश्चिम - अंधेरी पश्चिमचा भाग - 2049 रुग्ण, 674 बरे झाले
जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 1905 रुग्ण - 833 रुग्ण बरे झाले
के पूर्व - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 1875 रुग्ण, 583 बरे झाले
एम पूर्व - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 1696 रुग्ण, 435 रुग्ण बरे झाले
एफ दक्षिण--परळ, शिवडीचा समावेश - 1648 रुग्ण, 396 बरे झाले
एन - घाटकोपरचा समावेश - 1525 रुग्ण , 300 बरे झाले.