फक्त श्रीमंतीसाठी नाही तर 'या' महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखलं जातं अंबानी कुटुंबीय

पैशासोबत या गोष्टी आहेत खास 

Updated: May 31, 2021, 12:30 PM IST
फक्त श्रीमंतीसाठी नाही तर 'या' महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखलं जातं अंबानी कुटुंबीय  title=

मुंबई : अंबानी कुटुंबीय फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आपल्या कंपन्या आणि श्रीमंतीमुळे ओळखले जातात. तसेच अंबानी कुटुंबाची कंपनी, बिझनेस आणि नेट वर्कमुळे कायमच चर्चेत असतो. यासोबत अंबानी कुटुंबियांच्या श्रीमंतीसोबतच आणि काही खास गोष्टी आहेत. त्यामुळेच त्या कायमच चर्चेत असतात. या गोष्टी आर्थिक समृद्धीशी संबंधित नसून या गोष्टी नाती आणि भावनांशी संबंधीत आहे. 

पती-पत्नीचं नातं 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी बोललं जातं. मात्र या जोडीने एकमेकांचं नातं जे जपलं आहे त्याबद्दल खास बोलणं आवश्यक आहे. अंबानी कुटुंबात तसेच बिझनेसमध्ये अनेक चढ-उतार आले. यावेळी हे पती-पत्नी एकमेकांसोबत खूप खंबीरपणे उभे राहतात. हे दोघं एकमेकांना पुढे जाण्यास मदत करतात. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना कायमच सपोर्ट केला आहे. कायमच दोघं कपल गोल्स देताना दिसतात.

सासू-सूनेचं प्रेमाचं नातं 

मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी या आपल्या दोन्ही सुनांवर खूप प्रेम करतात. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल अभिमानाने सांगितलं. त्याचप्रमाणे नीता अंबानी या देखील त्यांची सून श्लोकावर भरपूर प्रेम करतात. तसेच होणारी सून राधिका मर्चेंट हिच्यावर देखील खूप प्रेम करतात. खूप ठिकाणी हे अनुभवता आलं आहे. सासू-सूनेत असं नातं असणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. 

मुलांना कृतज्ञ राहायला शिकवलं

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे पैशांची कमी नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना कधी बिघडू दिलं नाही. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना चांगली शिकवण दिली. लहानपणापासूनच त्यांनी मुलांना पैशाचं आणि मेहनतीचं महत्व शिकवलं.  याबाबतचा त्यांनी एक किस्सा सांगितला आहे की, ते आपल्या लहान मुलांना कायमच 5 रुपये द्यायचे एक दिवस मुलाने 10 रुपये मागितले कारण तो म्हणतो की, मला मित्र विचारतात की, तू अंबानीचा मुलगा आहेस की भिकारीचा

 पाहुणाचार करण्याची पद्धत 

अंबानी कुटुंबीय हे बिझनेसच्या बाबतीत डोक्याने विचार करतात यात काही दुमत नाही. मात्र ते कायमच लोकांशी आपलेपणाने वागताना दिसले आहे. कौटुंबिक सोहळ्यात तसेच सामाजिक कार्यात त्यांनी लोकांना दिलेली वागणूक ही नक्कीच कौतुकास्पद आहे. याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आहे.