#MumabiRains होतोय ट्रेंड, स्वेटर काढू की रेनकोट? ट्विटरवर मीम्सचा पाऊस

मुंबईत 1 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. #MumabiRains ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.

Updated: Dec 1, 2021, 03:56 PM IST
#MumabiRains होतोय ट्रेंड, स्वेटर काढू की रेनकोट? ट्विटरवर मीम्सचा पाऊस title=

मुंबई : मुंबईत थंडीच्या दिवसात अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा रेनकोट काढायचा की स्वेटर असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. प्रत्यक्षात बुधवारी सकाळी मुंबईकरांना जाग आली, तेव्हापासूनच पाऊस सुरू आहे. 1 डिसेंबरलाही शहरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. 

#MumabiRains ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. युजर्स या हॅशटॅगद्वारे सतत आपले जोक्स शेअर करत आहेत. यात अभिनेता रणदीप हुड्डाही मागे नाही. त्यांने म्हटलं की, हा हवामान संकटाचा परिणाम आहे.

मुंबईतल्या संकटाचं दुसरं नाव म्हणजे पाऊस. पाऊस जोरात सुरू झाला, तर मुंबईकरांची झोप मोडते. पण आता हिवाळात पाऊस पडताच सोशल मीडियाचे जगही मीम्सने भरून गेले आहे. युजर्स सतत चित्रपटातील फोटो वापरून मजेदार मीम्स शेअर करत आहेत.