मुंबईत झाड कोसळून चौघे जखमी

...

Updated: Jun 10, 2018, 02:31 PM IST

मुंबई : मुंबईतील दादर परिसरात अंगावर झाड कोसळून ४ जण जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. चौघांपैकी एका तरुणीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे.

दादरमधील शिवसेना भवन परिसरात स्वामी समर्थ मठाजवळची ही घटना आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

जखमींना हिंदूजा रूग्णालयात दाखल केले असता तिघांवर उपचार करून त्यांना सोडून दिले. तर, श्रेया राऊत या २० वर्षीय तरूणीवर उद्यापही उपचार सुरू आहेत.