हा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना

Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.   

सायली पाटील | Updated: Nov 8, 2023, 08:05 AM IST
हा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना  title=
Mumbai Air pollution calls for people stopping their morning walk excercise habits

Mumbai Air Pollution : मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आता आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. परिस्थिती सध्या इतक्या वाईट वळणावर पोहोचली आहे ही यंत्रणांनीही यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना तातडीनं काही सूचना केल्या आहेत. 

मुंबईतील प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं आता मुंबईकरांच्या दैनंदिनय व्यवहारांवर निर्बंध येताना दिसत आहेत. परिणामी आता या प्रदूषणामुळं नागरिकांना भलत्याच लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. सध्या शहरातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेत मॉर्निंग वॉक, संध्याकाळचा फेरफटका, व्यायाम , धावण्याची सवय अशा गोष्टी न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

इतकंच नव्हे तर, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी घराची दारं- खिडक्या बंद ठेवण्यासंबधीच्या सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील प्रदूषणाचा अभ्यास करत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या निकषांची आखणी करण्यासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्याचेही निर्देश राज्यातील आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार या टास्क फोर्समध्ये मुंबईतील पर्यावरण किंवा वैद्यकिय तज्ज्ञ, साथरोग विभागातील अधिकारी, पुणे पालिकेतील आरोग्य विभाग तज्ज्ञ, Byramjee Jeejeebhoy Government Medical College मधील फुफ्फुसरोग विभाग प्रमुख यांचा समावेश असेल असं सांगण्यात येत आहे. 

दिवाळीत फटाके वाजवण्यासंबंधीही नियम लागू... 

शहरातील वायू प्रदूषणानं धोक्याच्या पातळीच्याही पलिकडे जात यंत्रणांच्या चिंतेत भर टाकलेली असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं दिवाळीच्या काळात वाजवल्या जाणाऱ्या फटाऱ्यांसंबंधीचे काही निर्देश दिले. तर, सर्वोच्च न्यायालयानं देश पातळीवरही या वायू प्रदूषणाची दजखल घेत काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केली. 

हेसुद्धा वाचा : धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित 

न्यायालयाच्या निर्देशांनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत फटाके वाजवण्याची परवानगी असेल. हवेची खालावलेली गुणवत्ता पाहता मुंबई, ठाणे, नवी मुंबईसोबतच पनवेल, कल्याण, डोंबिवली, वसई- विरारमधील महापालिकांनीही तातडीनं उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली आहेत. इथं यंत्रणा वायू प्रदूषणाच्या विळख्यातून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच आता नागरिकांनीही या नियमांचं पालन करत संकटाशी लढण्यासाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे.