राकेश त्रिवेदी/ मुंबई : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील ८ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक । मुंबई एटीएसची कारवाई । जुहू युनिटने अरविंद एलियास गुद्दान त्रिवेदी आणि सुशील कुमार तथा सोनू तिवारी या दोघांना अटक केली@ashish_jadhao https://t.co/Ct4fYevvP7 pic.twitter.com/P1YjNN7XEe
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 11, 2020
गुंड विकास दुबेचे दोन साथीदार कानपूर हत्या प्रकरणात महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जात आहे. विकास दुबेचे हे दोन साथीदार ठाण्यात असल्याची माहिती मिळताच मुंबई एटीएसने त्यांना अटक केली. मुंबईतील जुहू युनिटने ही कारवाई केली आहे. अरविंद एलियास गुद्दन त्रिवेदी आणि सुशील कुमार तथा सोनू तिवारी या दोघांना अटक केली आहे. एन्काउंटर स्पेशल दया नायक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
कानपूरच्या पोलीस हत्याकांडाचा आरोपी आणि गँगस्टर विकास दुबेच्या पत्नीला ऋचा दुबेला पोलिसांनी लखनऊमधील कृष्णानगर परिसरातून अटक याआधीच अटक केली आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. ऋचा दुबेला घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली ाहे.
या दरम्यान, उत्तर प्रदेश एसटीएफने गँगस्टर विकास दुबेला अटक केली. त्यानंतर त्याला आनताना पळण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला. दरम्यान, कानपूर पोलिसांनी सांगितले की, विकास दुबेच्या पत्नीला ऋचा दुबेला देखील अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी दुबेच्या पत्नीला अटक केली आहे. त्याची मुले लहान असल्यामुळे आईसोबतच त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.