मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्याजवळ रुळाला तडे

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.

Updated: Jun 13, 2019, 07:21 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्याजवळ रुळाला तडे title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. जलद मार्गावरील वाहतूक धिम्या गतीवर वळवण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड हा मध्य रेल्वेच्या पाचवीला पुजलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचा खोळंबा सुरु आहे. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याआधीच सातत्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प होताना दिसत आहे.

सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन तब्बल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. विशेष म्हणजे गाड्या उशिराने का धावत आहेत याचे उत्तर देखील मध्य रेल्वेकडे नसते. मध्य रेल्वेकडून अनेकदा याची माहिती देखील दिली जात नाही. प्रवाशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संताप व्यक्त होत आहे. प्रवाशांपुढे मनस्ताप करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. मध्य रेल्वे काही सुधारण्याचे नाव घेत नाही.