Mumbai Corona Update | मुंबईत रुग्णसंख्येत वाढ की घट? पाहा दिवसभरात किती पॉझिटिव्ह?

कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या (mumbai corona update)  प्रमाणात झालेली वाढ गेल्या काही दिवसांपासून स्थिरावल्याचं चित्र आहे.

Updated: Jan 13, 2022, 07:57 PM IST
Mumbai Corona Update | मुंबईत रुग्णसंख्येत वाढ की घट? पाहा दिवसभरात किती पॉझिटिव्ह? title=

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ गेल्या काही दिवसांपासून स्थिरावल्याचं चित्र आहे. मुबंईत गेल्या 24 तासांमध्ये (Mumbai Corona Update)  दैनंदिन रुग्णसंख्येत घट झालेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 14 हजारांच्या खाली आहे. तसेच मृतांचा आकडयाही क्वचित पण कमी झाला आहे. तसेच कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे. (mumbai corona update 13 january 2022 today 13 thousand 702 positive patients found in city)

मुंबईत आज (13 जानेवारी) एकूण 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 20 हजार 849 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे झाल्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी

1 जानेवारी -  6 हजार 347

2 जानेवारी -  8 हजार 063

3 जानेवारी -  8 हजार 082

4 जानेवारी - 10 हजार 860

5 जानेवारी - 15 हजार 166 

6 जानेवारी - 20 हजार 181

7 जानेवारी- 20 हजार 971

8 जानेवारी- 20 हजार 318

9 जानेवारी - 19 हजार 474

10 जानेवारी - 13 हजार 648

11 जानेवारी - 11 हजार 647

12 जानेवारी - 16 हजार 420 

13 जानेवारी - 13 हजार 702