मुंबईत धक्कादायक घटना, ड्रायव्हरने दोन मुलींसह त्यांच्या आईला संपवले... त्यानंतर असं काही केलं की...

Mumbai Crime​ News : कांदिवली पश्चिमेतून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. आई आणि तिच्या दोन मुलींच्या हत्येनंतर चालकानेही आत्महत्या केली आहे. 

Updated: Jun 30, 2022, 12:24 PM IST
मुंबईत धक्कादायक घटना, ड्रायव्हरने दोन मुलींसह त्यांच्या आईला संपवले... त्यानंतर असं काही केलं की...   title=

मुंबई : Mumbai Crime News : कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि तिच्या दोन मुलींच्या हत्येनंतर चालकानेही आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Mumbai Crime News: mother with two daughters killed by Driver in Kandivali)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या आई आणि तिच्या दोन मुलींचा त्यांच्याच चालकाने आधी धारदार शस्त्राने वार करुन  हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे मृत महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आई मुलगी आणि चालक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चालकाने आधी मुलीच्या आईचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलींचा खून केला नंतर स्वतःच आयुष्य आरोपीने संपवले, अशी माहिती  पोलीस उपायुक्त (जनसंपर्क) संजय लाटकर यांनी दिली. 

ही बाब उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या कांदिवली पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केला आहे.