Crime News in Mumbai: वाढदिवसाचं सेलिब्रेशन ( Birthday Celebration) करणे एका तरुणाच्या जिवावर उठलं आहे. मुंबईत (Mumbai News) एका 20 वर्षीय तरुणाची त्याच्या जवळच्याच मित्रांनी हत्या केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या पार्टीनंतर बिल भरण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाचा जीव गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) चारही आरोपींना अटक केली आहे. यातील दोन अल्पवयीन असून त्यापैकी दोघांना तुरुंगात तर उर्वरित दोन अल्पवयीन मुलांना बालगृहात पाठवण्यात आले आहे. या तरुणाचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन अखेरचं ठरलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाच्या वाढदिवशी चार मित्रांनी मिळून त्याची हत्या केली. वाढदिवसाच्या पार्टीत खर्च झालेल्या पैशावरून साबीर नावाच्या तरुणाचा आणि त्याच्या चार मित्रांमध्ये वाद झाला. प्रकरण इतकं वाढलं की त्याच्या मित्रांनी साबीरची हत्या केली. गेल्या आठवड्यात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी शाहरुख आणि निशार या दोन आरोपी तरुणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
A 20-year-old youth named Sabir was allegedly murdered by four of his friends, two of whom were minors, following a dispute over sharing the food bill during Sabir's birthday party. The police arrested all four accused. Two accused- Shahrukh and Nishar were sent to jail and two…
— ANI (@ANI) June 6, 2023
नेमकं प्रकरण काय?
साबीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी डीजेची व्यवस्था केली होती. मित्रांनी साबीरला त्यासाठी पैसे देण्यास सांगितले. आपल्याकडे पैसे शिल्लक नाहीत, असे सांगत साबीरने त्याला नकार दिला. साबीरच्या वडिलांनी सांगितले की त्याने त्याच्या वाढदिवसाला 10,000 रुपये खर्च केले होते, तरीही त्याचे मित्र त्याला आणखी पैसे खर्च करण्यास सांगत होते. जेव्हा मुलाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या मित्रांना राग आला आणि त्यांच्याच बाचाबाची झाली. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. त्याच्या मित्रांनी साबीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, साबीरच्या मित्रांनी त्याच्या छातीत वार केले. या हल्ल्या साबीर गंभीर जखमी झाला.
त्यानंतर हा प्रकार साबीरच्या वडिलांना कळवण्यात आला. साबीरच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि साबीरला महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच साबीरचा मृत्यू झाला. दरम्यान, हत्येनंतर घटनेनंतर लगेचच दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अन्य फरार आरोपींना गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली.