मुंबई : गोरेगावच्या एसआरपीएफ कँप परिसरात बिबट्या शिरला. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. एसआरपीएफ कँपात हा बिबट्या सकाळच्या वेळी शिरला. त्यानंतर कँपात मुक्त संचार करता करता तो तिथल्या जिममध्ये शिरला. तिथेच त्याला अडकवण्यात आलं. वनखात्याला याची माहिती समजताच सकाळी २ तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला पिंजऱ्यात पकडण्यात आलं. गेल्या काही दिवसातलं हे सर्वाधिक वेगवान सुटका नाट्य होतं. डॉ. पेठे आणि डॉ. वाघमारे यांनी रामगावकर आणि लचके यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यात यश आलं.