मुंबई : गोवंडीमधली एक धक्कादायक बातमी. चौथ्या मजल्यावरुन पडूनही सव्वा वर्षांचं बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले. पण पालकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. हे यावरुन दिसून येते. हा निष्काळजीपणा जास्त धोकादायक आहे.गोवंडीमधल्या याच जय गोपी कृष्णा सोसायटीत चौथ्या मजल्यावर बरकडे कुटुंबीय राहतात. बाल्कनीत खेळता खेळता याच फ्रेंच विंडोमधून अवघ्या सव्वा वर्षाचा अथर्व खाली पडला. अर्थव तब्बल चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. पण सुदैवाने तो झाडांमध्ये अडकत अडकत खाली आला आणि खाली पडला. एवढ्या उंचावरुन पडूनही दैव बलवत्तर म्हणून अथर्वला फक्त खरचटले आहे.
बरकडे कुटुंब गेल्या वर्षभरापासून या इमारतीत राहत आहेत. या इमारतीच्या बिल्डरनं वर्षभर खिडक्यांना गज बसवले नाहीत. आणि इथे राहणाऱ्या कुणालाही ते आपणहून बसवून घ्यावेसेही वाटले नाहीत. याच आठवड्यात नाशिकमध्ये बाल्कनीतून पडून दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चिमुरड्यांची काळजी घ्या, हे वारंवार आवाहन करूनही पालकांचा निष्काळजीपणा नडत आहे. पालकांनो मुलांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, हेच आवाहन आहे.