मुंबई : मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं अशा बातम्या येत होत्या. पण मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार असल्याचं अदानी समुहाने स्पष्ट केलं आहे.
मुख्यालाय अहमदाबादला हलवण्याबाबतच्या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण अदानी समुहाने दिलं आहे. या संदर्भात अदानी समुहाने एक ट्विट केलं आहे. मुंबईबाबत आम्हाला सार्थ अभिमान आहे, मुंबईच्या रोजगार निर्मितीसाठी अदानी समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचंही समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
In light of rumours that the Mumbai Airport HQ will be moving to Ahmedabad, we unambiguously state that both MIAL and NMIAL Airports will remain headquartered in Mumbai. We reiterate our commitment to make Mumbai proud and create thousands of jobs through our airport ecosystem.
— Adani Group (@AdaniOnline) July 20, 2021
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा संकटात आलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहाने (Adani Airport Holdings Ltd (AAHL)स्वत:कडे घेतला आहे. तसेच नव्याने नवी मुंबई विमानतळाचा ताबाही एएचएलकडे आहे.