मुंबई : मुंबईतल्या जे जे रूग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाणीची घटना घडलीय. सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. तसंच त्यांनी रुग्णालयातल्या साहित्याचीही तोडफोड केली.
रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ११ सर्जरी विभागातली ही घटना आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ४ जणांना अटक केली, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केवळ डॉक्टरांनाच मारहाण केली नाही तर, रुग्णालयातील साहित्याचीही नासधूस केलीय. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.