प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द

Mumbai Local Train Update:  पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 23, 2024, 03:56 PM IST
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द title=
Mumbai Local train Few Western Railway Trains Affected Due To Block Between Virar Vaitarna

Mumbai Local Train Update:  पश्चिम रेल्वेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टीट गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळं ट्रेनचे वेळेपत्रक थोडे बिघणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विरार-वैतरणा दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेनला फटका बसणार आहे. विरार-वैतरणा सेक्शनमधील पुल क्रमांक 90 वरील पीएससी स्लॅब बदलण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी 24 मे ते शुक्रवारी 25 मे च्या मध्यरात्री 22.50 ते पहाटे 04.50 पर्यंत असेल.

पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या पूर्णतः तर काही आंशिक स्वरूपात रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे. विरार-डहाणू प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेकडून वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधण्यात येत आहे. 

या ट्रेन राहणार रद्द

- 24 मे 2024 रोजी 21.20 वाजता विरारहून सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल रद्द राहणार आहे. 

- 24 मे 2024 रोजी 22.45 वाजता डहाणू रोडवरुन सुटणारी विरार लोकल रद्द राहील

या गाड्या अंशतः रद्द 

- ट्रेन क्र 19426 नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस बोईसरपर्यंतच धावेल. बोईसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे. 

- ट्रेन क्र 090990 संजन-विरार MEMU डहाणू रोडपर्यंत धावेल आणि डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात  येणार आहे.

- ट्रेन क्र 09089 विरार-संजन मेमू विरार आणि वाणगाव स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे. दरम्यान वाणगाव रोड ते संजन दरम्यान धावेल.

- 09180 सुरत-विरार पॅसेंजर डहाणू रोडपर्यंतच धावणार आहे. डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे. 

- 19101 विरार-भरुच पॅसेंजर विरार डहाणू रोड स्थानकादरम्यान अंशत रद्द राहील. तसंच, डहाणू रोड आणि भरूच स्थानकादरम्यान धावेल. 

नियमित केल्या जाणाऱ्या लोकल

- 5 मे 2024 रोजी 04.40 वाजता डहाणू रोडवरून सुटणारी 93002 डहाणू रोड-चर्चगेट लोकल 00.50 मिनिटांपर्यंत नियमित केली जाईल.

-  ट्रेन क्र. 93004 डहाणू रोड - चर्चगेट लोकल 25 मे 2024 रोजी सकाळी 06.05 वाजता डहाणू रोडवरून सुटणारी लोकल 00.50 मिनिटांपर्यंत नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 25 मे 2024 रोजी 09284 डहाणू रोड-पनवेल लोकल, जी डहाणू रोडवरून 05.25 वाजता सुटणार आहे, ती 00.50 वाजेपर्यंत नियमित केली जाईल

- ट्रेन क्र. 12952 नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस 01.00 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 12297 अहमदाबाद-पुणे दुरांतो 24 मे 2024 रोजी 03.00 वाजता नियमित केले जाईल.

-ट्रेन क्र. १२२२८ इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस ०१.०० वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 19038 बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस 23 मे 2024 रोजी 03.05 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 22946 ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल 24 मे 2024 रोजी 03.00 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. १२९७८ अजमेर-एर्नाकुलम मारुसागर एक्सप्रेस २४ मे २०२४ रोजी ०३.०० वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 22928 अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस लोकशक्ती एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 02.30 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 19218 वेरावळ-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 2.30 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 12928 एकता नगर-दादर एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 02.30 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 22944 इंदूर-दौंड एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 2.30 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 14701 श्री गंगानगर - वांद्रे टर्मिनस अमरापुरा अरवली एक्सप्रेस 23 मे 2024 रोजी 02.15 वाजता नियमित केली जाईल.

-ट्रेन क्र. १२९०२ अहमदाबाद-दादर सुपरफास्ट एक्सप्रेस २४ मे २०२४ रोजी ०२.१५ वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 12962 इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 01.40 वाजता नियमित केली जाईल.

-ट्रेन क्र. 12956 जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस 24 मे 2024 रोजी 01.15 मिनिटांनी नियमित केली जाईल.

-ट्रेन क्र. 09084 डहाणू रोड-बोरिवली MEMU स्पेशल 25 मे 2024 रोजी 01.10 वाजता नियमित केले जाईल.

-ट्रेन क्र. 14707 बिकानेर-दादर रणकपूर एक्सप्रेस 01.00 मिनिटांनी नियमित केली जाईल.

-ट्रेन क्र. १२२१८ चंदिगड-कोचुवेली केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस ०१.०० वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 20944 भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस हमसफर एक्सप्रेस 01.00 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. 12268 हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस 01.00 वाजता नियमित केली जाईल.

- ट्रेन क्र. १२९७२ भावनगर-वांद्रे टर्मिनस एसएफ एक्सप्रेस ०१.०० वाजता नियमित केली जाईल.