Mumbai Local Train news in Marathi : लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जाते. मुंबईत (Mumbai Local ) दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करत असतात. ट्रेनशिवाय मुंबईची कल्पनाच करु शकत नाही. मुंबईत दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या 70-75 लाखाच्या पुढे आहे. सिग्नल बिघाड किंवा अन्य कारणांमुळे लोकल सेवा काही मिनिटांसाठी विस्कळीत झाली, तर पुढचं सगळ वेळापत्रक कोलमडते. लोकल ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील लोकलला मोठी गर्दी असेत.
जर तुम्ही रविवारी (7 जानेवारी 2024) घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा. कारण रविवारी मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉग घेतला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या दरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील तसंच नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचेल.
मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वेवरील पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 am ते दुपारी 4.05 pm वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल - बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल - बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी - नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.
हे सुद्धा वाचा : 22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
पश्चिम रेल्वेवर (WESTERN LINE)शनिवारी रात्री Mega Block असणार आहे. मुंबई सेंट्रल येथील लोकलच्या सर्व मार्गिकांवर ब्लॉक असेल.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे
कुठे - माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग
कधी- रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
हार्बर मार्ग
कुठे - पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्ग
कधी - रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
पश्चिम रेल्वे
कुठे - मुंबई सेंट्रल येथील लोकलच्या सर्व मार्गिकांवर
कधी - शनिवारी मध्य रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत