Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता हात दाखवा अन् करा मेट्रोचा प्रवास, पाहा कसा असेल तिकिटाचा नवा पर्याय?

Mumbai Metro 1 :  प्रवास मेट्रोचा असो किंवा रेल्वेचा, तिकीट नसेल तर प्रवास करु शकत नाही. तिकीट काढायचं म्हटलं की तिकीट खिडकीसमोरील  लांबच्या लांब रांगेत तात्काळ उभे राहावे लागतं. यावर पर्याय म्हणून मेट्रोने नवीन पर्याय काढला आहे. या पर्यायाचा नेमका प्रवाशांना कसा फायदा होणार आहे ते जाणून घ्या...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 11, 2024, 02:28 PM IST
Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता हात दाखवा अन् करा मेट्रोचा प्रवास, पाहा कसा असेल तिकिटाचा नवा पर्याय? title=

Metro 1 Launches Handheld Smart Bands in Marathi: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई मेट्रोकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गावरुन 4 लाख प्रवाशांना लवकरच तिकीटाच नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने नवीन प्रकारच्या तिकीट प्रणालीचे उद्घाटन केले आहे. नेमका हा तिकीटाचा नवा पर्याय काय असणार ते जाणून घ्या...

मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरुन प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीटाची गरज पडणार नाही. तसेच मोबाईलवरुन क्यूआर कोड स्कॅनची गरज देखील पडणार नाही. कारण मुंबई मेट्रो 1 ने नवीन तिकीट पर्याय म्हणून टॅपटॅप रिस्टबॅंड सादर केला. ज्यामुळे प्रवाशांना विनाअडथळा प्रवेशासाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल.  टॅपटॅप रिस्टबॅंड स्कॅन करुन मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. 

टॅपटॅप रिस्टबॅंडची वैशिष्ट्ये

मेट्रो 1 चा हा बँड पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवला आहे. ऍलर्जी नसलेले आणि त्वचेला त्रास न देणारा हा बॅंड असणार आहे. मेट्रोने हा बँड 200 रुपयांच्या ऑफर किंमतीत सादर केला आहे. एएफसी गेटला फक्त बँडवर टॅप करावे लागेल.  मुंबई मेट्रो वनच्या सर्व ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर हा बॅंड उपलब्ध आहे. हे उत्पादन मुंबई मेट्रोच्या बिलबॉक्स प्युरिस्ट टेक सोल्युशन्सच्या सहकार्याने विकसित केले आहे. सध्या वापरात असलेल्या प्रवासी स्टोअर व्हॅल्यू पासनुसार त्यांचे टॅपटॅप रिस्टबँड खरेदी आणि रिचार्ज करू शकतात. MMOPL अधिकाऱ्यांनी पारंपारिक पेमेंट पद्धतींच्या तुलनेत कमी झालेल्या कार्बन फूटप्रिंटवर जोर देऊन TapTap चे पर्यावरणीय फायदे हायलाइट केले. रिस्टबँड बॅटरीशिवाय चालतो, जलरोधक आणि टिकाऊ आहे.  तसेच या बॅंडचा पावसाळ्यातही वापर केला जाईल.  हा बॅंड धुवू देखील शकतो.. MMOPL बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीच्या सहकार्याने मनगटावरील बॅण्डची संकल्पना पुढे आणून प्रत्यक्षात उतरवली आहे. सिलिकॉन वापरून हा बँड वापरून तयार केलेले वापरण्यास अतिशय सोपे आहेत. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमओपीएलला आहे.  मुंबई मेट्रो वनने टॅपटॅपच्या सादरीकरणासोबतच परतीच्या प्रवासाची तिकिटे, मासिक अमर्यादित प्रवास पास आणि व्हॉट्सॲप ई-तिकीटिंग समाविष्ट करण्यासाठी तिकीट पर्यायांचा विस्तार केला आहे.