मुंबई : चीनमध्ये (China) कोरोनाचं (Corona) थैमान सुरु असून देशातही केंद्र सरकारने (Central Government) अलर्ट नोटीस (Alert Notice) जारी केली आहे. यादृष्टीने देशातली सर्व राज्य सरकारने आपापल्या परीने तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही टास्क फोर्सची स्थापना केली आहे. तर कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकाही (Mumbai Municipal Corporation) सज्ज झालीय. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये (Hopitals) कोरोनाबाधित रुग्णांसाठी 2 हजार 804 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसंच कोरोनाविषयक नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
वॉर्डनिहाय वॉर रुमही सज्ज करण्यात आलेत. त्यामुळे मुंबईकर कोणत्याही अडचणीच्या वेळी वॉर रुम (War Room) किंवा नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधू शकतात. कोरोना रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात प्राणवायूही उपलब्ध ठेवण्यात आला आहे. कोरोना चाचण्यांवर
(Testing) भर देण्यात आला असून रुग्णांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. तसंच मुंबई विमानतळावर (Mumbai Air Port) विदेशी प्रवाशांच्या चाचण्याही करण्यात येतील.
कोणत्या रुग्णालयात किती बेड?
मुंबईत पुन्हा कोरोनाची स्थिती उद्भवलीच तर मुंबई महापालिकेने काही रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवले आहेत. यात मुंबई महापालिकेच्या सेव्हन हिल्स मध्ये 1700 बेड तर कस्तुरबा रुग्णालयात 35 बेड राखीव ठेवण्यात आल आहेत. याशिवाय कामा रुग्णालय (100 बेड), सेंट जॉर्ज रुग्णालय (70 बेड), टाटा रुग्णालय (16 बेड), जगजीवन राम रुग्णालय (12 बेड)चार सरकारी रुग्णालये आणि 871 खाटांची 26 खासगी रुग्णालये आहेत. शिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
24 तास वॉर रुम
मुंबई महानगरपालिकेच्या 24 वार्डांमध्ये 24 x 7 वॉर्ड वॉर रूम कार्यरत आहेत. नागरिकांना कधीही आणि कोणतीही अडचण वाटल्यास वॉररुमशी संपर्क साधून शकतात. कोविड-19 रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करणं, कोरोना रुग्ण आणि रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचं सर्वेक्षण करणं, नियमित RT-PCR चाचणीवर भर देणं, वॉर्ड वॉर रूमद्वारे जनतेशी संवाद साधणं, लसीकरण मोहीम प्रभावीपणे पार पाडणे आदी उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य
कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं काय गाईडलाईन्स जारी केल्यात.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा
गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखा
साबण आणि सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ ठेवा
आजारी असताना घरी अलगीकरणात रहा
वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावा.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.