गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.   

सायली पाटील | Updated: Sep 6, 2024, 11:06 AM IST
गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य title=
Mumbai News Coastal Road to will be open for 24 hours amid ganeshotsav festival

Ganeshotsav In Mumbai : यंदाच्या वर्षी मुंबईतील (Mumbai News) गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि गणएश भक्तांची होणारी गर्दी पाहता प्रशासनानंही जोरदार तयारी केली असून, याच धर्तीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. याच निर्णयांपैकी एका गोष्टीमुळं नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून काहीशी उसंत मिळणार आहे. कारण, शहरात, दक्षिण मध्य मुंबईसह इतर भागांमध्ये कितीही वाहतूक कोंडी असली तरीही शहरातील एका वाटेवर मात्र सुसाट प्रवास करणं शक्य होणार आहे. तेसुद्धा दिवसभर. 

(Ganesh Chaturthi 2024) गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुविधेसाठी 6 ते 18 सप्टेंबरदरम्यान धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग अर्थात मुंबईतील (Coastal Road Mumbai) कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्ग, अटलसेतुकडून दक्षिण मुंबईच्या दिशेनं उत्तर मुंबईकडे जाण्याकरीता पूर्व मुक्त मार्ग, पी. डिमेलो मार्ग, कल्पना जंक्शन, सी.एस.एम.टी. जंक्शन – महापालिका मार्ग – मेट्रो जंक्शनवरून कोस्टल रोडपर्यंत पोहोचता येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Ganesh Utsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना 

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार उत्तर मुंबईकडून दक्षिण मुंबईमार्गे पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूकडे जाण्यासाठी वाहनधारकांनी सागरी किनारा मार्ग दक्षिण वाहिनी, प्रिंसेस स्ट्रीटवरून उजवं वळण घेत श्यामलदास जंक्शन-  श्यामलदास मार्ग डावे वळण मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग उजवे वळण – सी. एस.एम.टी. जंक्शन – डावे वळण भाटिया बाग जंक्शन डावे वळण कल्पना जंक्शन – पी. डिमेलो मार्ग – पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूच्या दक्षिण वाहिणीचा वापर करावा. 

शहरातील 'या' पुलांवरून गणपती मिरवणुका नेताना सावधान 

गणशोत्सवाच्या धर्तीवर सध्या पालिका प्रशासन सज्ज झालं असून, शक्य त्या सर्व परिंनी नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच धर्तीवर शहरातील धोकादायक पुलांची यादीही जारी करण्यात आली आहे. इथून प्रवास करताना नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

कोणते पूल धोकादायक? 

कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक रेल ओव्हर पूल, घाटकोपर रेल ओव्हर पूल, करीरोड रेल ओव्हर पूल, चिंचपोकळी रेल ओव्हर पूल, भायखळा रेल ओव्हर पूल, मरीन लाईन्स रेल ओव्हर पूल, सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर पूल, फ्रेंच रेल ओव्हर पूल, केनडी रेल ओव्हर पूल, फॉकलन्ड रेल ओव्हर पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी