Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details

Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल... 

सायली पाटील | Updated: Jun 11, 2024, 11:24 AM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details  title=
Mumbai news Mhada to build 3600 new houses In Mumbai Location price Check Full Details

Mumbai Mhada Homes News : मुंबई... या शहरात दरदिवशी अनेकजण येतात, नोकरीपाण्याच्या शोधात मुंबईची वाट धरणाऱ्या अनेकांनाच या शहरानं आपलंसं केलं. काही मंडळी मात्र आजही या शहरात स्वत:चं स्थान बनवू पाहत आहेत. तर, काही नोकरी, आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर याच शहरात हक्काच्या घराचा शोध घेताना दिसत आहेत. 

मुंबई शहरातील मुख्य निवासी ठिकाणं आणि शहराच्या काही भागांमध्ये सध्याच्या घडीला घरांचे दर इतके झपाट्यानं वाढले आहेत, की काही मंडळींनी घर खरेदीचा विचारच दूर लोटला आहे. काहींनी मात्र अद्यापही हे स्वप्न उराशी बाळगलं असून, त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरूच आहेत. अशा सर्वच मंडळींसाठी महाराष्ट्र हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी (MHADA) कडून किफायतशिर दरांना घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

म्हाडा उभारणार 3 हजारांहून अधिक घरं...

येत्या काळात म्हाडाकडून मुंबईत 3600 नव्या घरांची निर्मिती करण्यात येणार असून, विविध उत्पन्न गटातील नागरिकांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी म्हाडाची ही तरतूद असून, गोरेगाव, अँटॉप हिल, कन्नमवार नगर, पवई, मागाठाणे या भागांमध्ये ही घरं उभारण्यात येणार आहेत. या घरांसाठी म्हाडा येत्या काळात सोडत जाहीर करणार असून, त्यामुळं अनेकांनाच हक्काच्या घर खरेदीचं स्वप्न साकारण्यासाठी हातभार लागणार आहे. 

मागील योजनेतून इतकी घरंही सोडतीचा भाग? 

2023 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4082 घरांसाठीची सोडत काढण्यात आली होती. पण, या सोडतीतून 150 घरांची विक्री अद्याप होऊ शकलेली नाही. सध्या ही घरं waiting list मध्ये नावं असणाऱ्या अर्जदारांसाठी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु असून, या माध्यमातूनही घरांची विक्री झाली नाही, तर येत्या काळात नव्या 3600 घरांसह सोडतीत या 150 घरांचाही समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान आगामी सोडतीतील घरांच्या किमती समोर आल्या नसल्या तरीही सर्व उत्पन्न गटांसाठीच्या या सोडतींमध्ये विविध दरांमध्ये आणि चौरस फुटांमध्ये ही घरं उपलब्ध असतील असं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : भन्नाट! सूर्याच्या जवळ जात Aditya L1 नं टिपली अद्भूत दृश्य 

2024-25 या आर्थिक वर्षामध्ये म्हाडाच्या वतीनं मुंबई आणि उपनगरांसह कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर इथंही घरं उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं या सोडतीवरही अनेकांचं लक्ष अलेल यात शंका नाही.