Section 144 : मोठी बातमी! मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी; 'या' गोष्टींवर येणार निर्बंध

Section 144 : मुंबई पोलिसांनी शहरात 2 जानेवारीपर्यंत मोठा जमाव, मिरवणुका करण्यास मनाई आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे  

Updated: Dec 2, 2022, 03:15 PM IST
Section 144 : मोठी बातमी! मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी; 'या' गोष्टींवर येणार निर्बंध title=

मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे (Section 144) आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईत कलम 114 लागू असणार आहे. यासोबतच संपूर्ण शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी (public places) कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाईदेखील असणार आहे. तसेच 2 जानेवारी पर्यंत शहरात शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

शांतता राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे व्यत्यय टाळण्यासाठी, मुंबई पोलिसांनी 2 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. या कालावधीत संपूर्ण शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. मानवी जीवन आणि मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याच्या अनेक घटनांनंतर, मुंबई पोलिसांनी 2 जानेवारीपर्यंत कर्फ्यूसदृश्य बंदी जाहीर केली आहे.

मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत हे आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार मुंबईत 2 जानेवरीपर्यंत कोणत्याही प्रकारचा मेळावा, मिरवणूक, आंदोलने इत्यादींवर बंदी असणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्या गोष्टींवर बंदी?

- सार्वजनिक ठिकाणांभोवती मोठ्या प्रमाणात सामाजिक मेळावे घेण्यास मनाई
- फटाके फोडणे, लाऊडस्पीकर वाजवणे, वाद्ये व बँड वाजवण्यावर बंदी
- सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शने करण्यास बंदी.
- मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी 
- सर्व प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी.
- बंदुक, तलवारी आणि इतर अशा शस्त्रांना परवानगी नाही.

या उपक्रमांव्यतिरिक्त, दुकाने आणि आस्थापनांमध्ये व्यवसाय आणि विनंतीसाठी बैठका, इतर मेळावे आणि मिरवणुकांचे प्रदर्शन यावरही बंदी घालण्यात आली आहे.

कोणत्या गोष्टींना परवानगी?

- सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये

- शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा आसपास संमेलने.

- कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या कायदेशीर बैठका.