मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश लागू करू शकतात. जर तुम्हाला देखील मुंबई विद्यापिठाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर अर्ज करू शकता. शैक्षणिक वर्ष २०२४ च्या पदवी शिक्षणाच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन लिंक देण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश करू शकतात. muadmission.samarth.ac.in. यामार्फत प्रवेश प्रक्रिया करून अधिक माहिती देखील मिळवू शकतात.
अंतिम तारीख काय ?
मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रिया २२ मेपासून सुरू झाली असून १५ जून २०२४ही शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आधी फॉर्म भरावे. १५ जून संध्याकाळी ६वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील .
या तारखांची नोंद ठेवा .
⦁ प्रवेश प्रक्रिया २२ मे ते १५ जूनपर्यंत सुरू राहतील .
⦁ डॉक्यूमेंट्सची ऑनलाइन पडताळणी २० जूनपर्यंत होतील.
⦁ पहिली तरतुद मेरीट लिस्ट २१ जूनला उपलब्ध होईल.
⦁ विद्यार्थांना कोणतीही अडचण असल्यास २५ जूनपर्यंत देता येईल
⦁ प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ जून ते १जुलैपर्यंत फी भरू शकतात.
⦁ दुसरी मेरिट लिस्ट २ जुलैला लावण्यात येईल.
⦁ या विद्यार्थ्यांनी ३ ते ५ जुलैमध्ये फी जमा करावी.
⦁ त्यानंतर १ जुलैपासून पहिल्या मेरीटचे क्लासेस सुरू होतील.
खालील सोप्या पद्धतीने करा अप्लाय ..
⦁ मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर कोर्स प्रवेश घेण्यासाठी muadmission.samarth.ac.in. या लिंक वर जा.
⦁ होम पेजवरील 'New Candidates Registration Link ' या वर क्लिक करा.
⦁ त्यानंतर एक पेज ओपन होईल , एप्लीकेशन फॉर्म वर आवश्यक ती सर्व माहिती भरा.
⦁ मागितलेले डॉक्युमेंट्स जमा करा.
⦁ पुढील टप्प्यातील फी ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतात.
⦁ नंतर एप्लीकेशन फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिट बटन वर क्लिक करा.
⦁ कंन्फर्मेशन पेज डाऊनलो़ड करून त्याची एक प्रिंट स्वत; जवळ ठेवावी.