मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.  

Updated: Apr 19, 2018, 11:40 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा? title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. शोध  समितीनं निवडलेले अंतीम पाच उमेदवार राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर अंतिम उमेदवाराची निवड केली जाईल. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

डॉ. संजय देशमुख यांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरुन हटवल्यानंतर नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमण्यात आली होती. या समितीनं गेल्याच आठवड्यात अंतिम पाच जणांची नावं राज्यपालांकडे सुपूर्त केली. त्यानुसाऱ्या पाच जणांना अंतिम सादरीकरणासाठी आज राजभवनात आमंत्रित करण्यात आलंय. सकाळी साडेअकराच्या सुमारास हे सादरीकरण सुरु होईल. त्यानंतर राज्यपाल कुलगुरुंचं नाव जाहीर करतील.