तृप्ती सावंतांची बंडखोरी शिवसेनेला भोवली, महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत

तृप्ती सावंत यांची बंडखोरी शिवसेनेला चांगलीच महागात पडली आहे.

Updated: Oct 24, 2019, 01:29 PM IST
तृप्ती सावंतांची बंडखोरी शिवसेनेला भोवली, महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत  title=

मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे वांद्रे विधानसभा मतदार संघातून तब्बल १६०० मतांनी पराभूत झाले आहेत मातोश्रीच्या अंगणातच हा पराभव झाल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. तृप्ती सावंत यांची बंडखोरी शिवसेनेला चांगलीच महागात पडली आहे. काँग्रेसच्या झीशान सिद्दकी यांचा या ठिकाणी विजय झाला आहे. 

वरळीतून आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. तर शिवडी मतदारसंघातूनही शिवसेना आघाडीवर आहे. पण वांद्रे येथील हा निकाल शिवसेनेला विचार करायला भाग पाडणार आहे. 

तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र