close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरून उडी मारत जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या

हरेंद्र कपाडिया यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

Updated: May 14, 2019, 10:05 AM IST
'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरून उडी मारत जीएसटी अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई : मुंबईत 'गुडस एन्ड सर्व्हिस टॅक्स' (GST) विभागात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. 'वर्ल्ड ट्रेड सेन्टर'वरून उडी मारत त्यांनी आपलं जीवन संपवलं. 

हरेंद्र कपाडिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 'जीएसटी अधिक्षक' या पदावर ते कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.

हरेंद्र कपाडिया यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. सध्या, पोलिसांनी हरेंद्र कपाडिया यांच्या मृत्यूची 'अपघाती मृत्यू' अशी नोंद केलीय.