मुंबईचा कोरोना डबलिंग रेट २९ दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.

Updated: Jun 17, 2020, 09:18 PM IST
मुंबईचा कोरोना डबलिंग रेट २९ दिवसांवर title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता 29 दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता  2.43 टक्क्यांवर आहे. 

एफ उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तब्बल 60 दिवसांवर पोहोचला आहे. तर रूग्ण वाढीचं प्रमाण 1.2 टक्के असं सर्वात कमी आहे. 

एच पूर्वमध्ये रुग्ण दुप्पट व्हायला 57  दिवस लागलेले असून तेथील रुग्ण वाढीचा सरासरी दर एफ उत्तरप्रमाणे 1.2 टक्के असाच आहे. 

सर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार?

 

एम पूर्व 53 ( 1.3%),  एल 51 ( 1.4%) आणि ई 50 ( 1.4%) या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त आहे. तर रुग्णवाढ सरासरी 2% पेक्षा कमी आहे. याशिवाय जी उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 46 असून बी विभागात 40 दिवस आहे. या विभागांचा रुग्णवाढीचा सरासरी दर अनुक्रमे 1.5 टक्के आणि 1.7 टक्के असा आहे.

काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र आज धारावीत 17 नवे रुग्ण वाढले आहेत. धारावीत आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2106 झाली आहे. धारावीत आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 78 झाली आहे. दुसरीकडे दादरमध्ये 13 रुग्ण वाढले. तर माहिममध्ये २७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

मुंबईत आतापर्यंत 61 हजार 587 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 31 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 3244 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत 26 हजार 997 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर वीकेंड होमची मागणी वाढणार