मुंबई : श्रीमंत शहरांच्या जागतिक यादीत मुंबई बाराव्या स्थानावर आलीय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईची संपत्ती 61 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. जगात सगळ्यात जास्त संपत्ती न्यूयॉर्क या शहराची आहे.
न्यूयॉर्क शहर 113 लाख कोटी संपत्तीसह न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर सर्वाधिक अब्जाधीश वास्तव्याला असणा-या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या दहा शहरांमध्ये आहे. मुंबईत तब्बल 28 जण अब्जाधीश आहेत.
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात ही सगळी माहिती समोर आलीय. या एकूण संपत्तीत सरकारी निधीचा समावेश नाही. खासगी मालमत्ता, रोकड, शेअर्स आणि व्यवसायातली मालमत्ता यांचा यामध्ये समावेश आहे.