Mumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी

Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली  एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे.  मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Updated: Dec 22, 2022, 01:15 PM IST
Mumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : टीव्ही वरील प्रसिद्ध शो CID मध्ये पोलिस अत्यंत रहस्यमय पद्धतीने आरोपींचा छडा लावून गुन्ह्याची उकल लावतात. CID पेक्षा भारी Murder Investigation नवी मुंबई पोलिसांनी(Navi Mumbai Police) केले आहे. खुन्यापर्यंतचा कोणताच पुरावा सापडत नव्हता. पोलिसांनी चप्पलवरुन खुनी शोधला आहे. महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत( Crime News). 

पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली  एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे.  मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

मृतदेह अज्ञात असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती.  अखेर महिलेच्या पायातील चप्पलवरुन पोलिसांनी खुन्याचा शोध सुरु केला. या महिलेने घातलेली नवीन ब्रँडेड चप्पल कुठे भेटते या दुकानाची माहिती पोलिसांनी काढली. यानंतर दुकानाचे सिसिटीव्ही तपासले असता पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. 

आरोपी हा बॉडी बिल्डर असल्याचे निदर्शनास आले. यावरून सर्व जिममध्ये माहिती घेतली असता घणसोली येथील एका जिम मध्ये आरोपी ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागला. 

मुख्य आरोपी रियाज खान आणि सह आरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मयत महिलेची ओळख पटली आणि तिची सर्व माहिती हाती लागली. मृत महिला नेरुळ येथील एका बार मध्ये कामाला होती. तिचे मुख्य आरोपी रियाज खान सोबत प्रेम संबंध सुरु होते.  वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने तिची रियाजने आपला साथीदार इम्रानच्या सहकार्याने महिलेचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाणपूलाखाली फेकून दिला. मृतदेह अनोळखी असताना. हाती कोणाताही पुरावा नसताना फक्त चप्पल वरुन आरोपीचा शोध लावला. पोलिसांच्या या कामगिकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.