मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरुन मारण्याची धमकी दिली आहे. एका खासगी वाहिनीवर चर्चात्मक कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला धमकी दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना धमकी
अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्या गाय संबंधित वक्तव्यांवरील चर्चासत्रात भाग घेतलेले नवाब मलिक यांना शुक्रवारी दोन फोन क्रमांकावरुन धमकी मिळविण्याचा दावा केला आहे. या धमकी प्रकरणी त्यांनी गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. आपल्याबाबत जर बरेवाईट काही झाले तर ते फडणवीस सरकारचीची जबाबदारी असेल, असे ते म्हणालेत. याबाबत मलिक ट्विट केले आहे त्यांनी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना हॅशटॅक केले आहे.
When asked Malik said the TV debate was regarding Shah’s recent “cow death given more significance than a police officer’s” comment.
“After the debate I got threat calls from two numbers.
I have informed local police station too about it,” he added.
या धमकीबाबत मी स्थानिक पोलीस स्टेशनलाही याची माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. या धमकीनंतर राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याआधी म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रात दिली आहे. मात्र, त्यांनाही संरक्षण पुरविण्यात आलेले नाही. याबाबत त्यांनीही काही झाले तर ती सरकारची जबाबदारी असेल असे म्हटलेय.