'पार्थ लंबी रेस का घोडा, थांबू नकोस मित्रा', नितेश राणेंचा पार्थ पवारांना पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलेच नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated: Aug 12, 2020, 06:34 PM IST
'पार्थ लंबी रेस का घोडा, थांबू नकोस मित्रा', नितेश राणेंचा पार्थ पवारांना पाठिंबा title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलेच नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवारच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यासाठी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावरुनच शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला. 

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांना पाठिंबा दिला आहे. आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है! थांबू नकोस मित्रा, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.

पार्थ पवार वेगळी भूमिका का घेत आहेत?