मुंबई : नितीन गडकरी भाजपचे एक महत्वाचे नेते. नागपूरमधील त्यांचा वाडा नेहमीच गर्दीनं भरलेला असतो. नागपूरचं नव्हे तर पूर्ण विदर्भातलं बडे प्रथा म्हणून त्यांची ओळख. राज्यात सार्वजिनक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी बांधलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गाचं नेहमीच कौतुक होत असतं.
अत्यंत बिझी शेड्युल असूनही नितीन गडकरींना सोशल माध्यम यु ट्यूबचा लळा लागलाय. फुरसत असेल तेव्हा गडकरी आपला वेळ यु ट्युबवर घालवितात. पण ते टाईमपास म्हणून नव्हे तर पैसे कमवण्यासाठी.. आश्चर्य वाटतंय ना? पण, हे खरंय आणि खुद्द नितीन गडकरी यांनीच त्याची कबुली दिलीय.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सारं जग ठप्प झालं होतं. अनेक नागरिक ठाकठिकणी अडकून पडले होते. यात चलती होती ती यु ट्यूबची. या काळात अनेकांना यु ट्यूबचा आधार मिळाला होता. अनेक जण आपल्या नव्या शिकलेल्या रेसिपी फेसबुक, इंस्टा, युट्यूबवर टाकू लागले.
या सगळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही मागे राहिले नाहीत. कोरोना काळात त्यांनी युट्यूब वरचे व्हिडिओ पाहून कुकिंग करायला सुरुवात केली. त्यांचा इंटरेस्ट वाढू लागला. त्यांनाही आपलं स्वतःचं चॅनेल युट्यूबवर असावं असं वाटू लागलं.
गडकरी यांनी मग एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी कोरोना काळात केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि सरकारी धोरणांची माहिती युट्यूब चॅनेलवर देण्यास सुरुवात केली. त्याकाळात गडकरी यांनी अनेक देशांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.
त्यांनी या संवादाचे व्हिडिओ त्यांच्या नव्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केले. पहाता पहाता त्यांचे व्हिडिओ लोक पाहू लागले. व्हिडिओंचा रीच वाढला. मोनिटायजेशन ऑन झालं आणि गडकरी यांना त्याचा दाम मिळू लागला.
नितीन गडकरी यांच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचए रिच वाढू लागले आणि गडकरी यांना दरमहा चार लाख रुपये मिळू लागले.