...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरूनच जलवाहतूक सुरू करायला निघाले गडकरी!

एकीकडे मुंबईत पाण्यात बुडून लोकं मरतात आणि दुसरीकडे...

Updated: Dec 1, 2018, 03:22 PM IST
...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरूनच जलवाहतूक सुरू करायला निघाले गडकरी! title=

मुंबई : मुंबईच्या सांडपाणी व्यवस्थेची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खिल्ली उडवलीय. मुंबईच्या रस्त्यावर एवढं पाणी साचतं की, रस्त्यावरूनच जलवाहतूक मार्ग सुरू होईल, अशी टीका गडकरींनी मुंबई प्रशासनावर केलीय. एकीकडे मुंबईत पाण्यात बुडून लोकं मरतात आणि दुसरीकडे मुंबई पालिकेचे काही हजार कोटींचे डिपॉझिट बँकेत आहे. तेव्हा मुंबईची सर्व सांडपाणी व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. 'मुंबई टू' या पायाभूत प्रकल्पांवर आधारित परिषदेत गडकरी बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत केले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. 

मुंबईच्या रस्त्यावर एवढे पाणी साचते की आता रस्त्यावरूनच जलवाहतूक मार्ग सुरू केला पाहिजे, असं सांगत मुंबईच्या सांडपाणी व्यवस्थेची गडकरी यांनी खिल्ली उडवली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होत असल्याच्या घटनांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. 

दरम्यान मुंबईतील RCF आणि तेलशुद्धीकरण प्रकल्प बाहेर नेण्याची गरजही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील प्रदूषण गंभीर आहे. आता बंदरे आणि रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले असल्याने मुंबई शहराच्या पूर्व किनाऱ्यावर प्रदूषण करणारे कारखाने हे शहराबाहेर नेण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.