मुंबई : शहरातील (Mumbai ) अनेक कोविड लसीकरण केंद्रावरील (COVID-19 Vaccination) कोरोना लसीचा साठ संपल्याने कोरोना (Coronavirus) लसीकरण थांबविण्यात आले आहे. (No corona vaccination ) पुढील आदेश होईपर्यंत कोरोना लसीकरण होणार नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pedanekar) यांनी दिली आहे. दरम्यान लसीकरणासाठी केंद्रांवर होणाऱ्या गर्दीवरुन त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आली आहेत. यामुळे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागत आहे. (No corona vaccination in Mumbai till further orders - Kishori Pedanekar)
मुंबईत अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. आपल्याकडे अत्यंत अल्प साठा आहे. 76 हजार ते 1 लाख लसीचे डोस येत असल्याचे मला मीडियाकडून समजले आहे. असे असले तरी हे लसीचे डोस अपुरे पडणार आहे. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांचीच मोठी रांग आहे. बीकेसीमध्ये केंद्राबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. रुग्ण वाढत असताना लस घेऊन सुरक्षित राहावे, अशी लोकांची भावना आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
There are several vaccination centers that have zero vaccines now and vaccination has stopped there...I have come to know that some 76,000 to 1 Lakh doses are about to reach Mumbai by today but I don't have any official info on this: Mumbai Mayor Kishori Pednekar#COVID19 pic.twitter.com/vmBfxmXaIY
— ANI (@ANI) April 9, 2021
पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळालाच पाहिजे. राज्याचा केंद्राशी पत्रव्यवहार झाला आहेत, केंद्र सरकारची यंत्रणा सकारात्मक नाही, यामध्ये हकनाक सामान्यांचा जीव जात आहे , असा आरोप केंद्र सरकारवर महापौर पेडणेकर यांनी केला आहे. वेळेत दुसरा डोस मिळाला नाही तर लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात. आज 1लाख 76 हजार लस येतील पण त्या अपुरी पडेल, कारण दुसरा डोस घेणारेच अजून खूप जण आहेत. कोणतंही राजकारण जर नये, लोकांना वाचवायच आहे, लोकसंख्येप्रमाणे लसीच वाटप व्हावे, असे त्या म्हणाल्या.
लसींचा साठा बोर्डावर लावला जाणार आहे. किती केंद्र बंद झाली आणि होतील याची अधिकृत आकडेवारी अजून मिळालेली नाही. लोकांना कोणी उकसवू नये. बेड वाढवले आहेत, मॅन पॉवरही तयार करत आहोत, टीका करू नये, मदतही करावी, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, जनतेला लस नाही, मात्र राजकीय नेत्यांना लस दिली जात असल्याचा आरोप सर्वसामान्य लोक करत आहेत. लससाठा आज संपणार असं माहीत असतानाही काही सेंटरवर लोकांना लस देणार म्हणून लावण्यात आले, असा नागरिकांचा आरोप आहे. माहीम इथले लसीकरण केंद्र लसींच्या साठ्याअभावी बंद आहे.