ओला आणि उबेरचा संप आणि मनसेची तोडफोड

रविवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारला आहे. 

Jaywant Patil Updated: Mar 20, 2018, 01:12 AM IST
ओला आणि उबेरचा संप आणि मनसेची तोडफोड title=

मुंबई : ओला आणि उबेरचा रविवारी संप होता. चांगलं उत्पन्न मिळावं, या मागणीसाठी, ओला आणि उबेर चालकांनी रविवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं हा संप पुकारला आहे. 

वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गाड्यांची तोडफोड

ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतील, त्यांना मनसेचे कार्यकर्ते धमकावत आहेत. सायन चुना भट्टीमध्ये मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची तोडफोड केली. मुंबईत ओला, उबेरचे तीस हजार चालक आहेत. मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे. अनेक मुंबईकर शेअर ओला किंवा उबेरनं ऑफिसला जातात. 

मुंबईकर शेअर ओला किंवा उबेरनं ऑफिसला

हा संप लक्षात घेता मुंबईकरांच्या सोईसाठी अतिरिक्त बसेस, आणि टॅक्सींची सोय करण्यात आली आहे. तसंच नव्यानं सुरू झालेल्या हायब्रीड एसी बसचा पर्यायही मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे.