दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Post Office Job: एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 9, 2023, 02:41 PM IST
दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Post Office Job: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्या कामाची बातमी आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत भरती सुरु असून येथे दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत अभिकर्ता या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव असावा. ही नोकरी सरकारी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना परवाना दिला जाणार आहे. उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी 50 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रुपये भरावे लागतील. 

मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

एजंट पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.  16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड,आधार कार्ड (मूळ प्रत आणि 1 झेरॉक्स), 3 फोटो आणि अन्य 3 महत्वाचे दस्तावेज आणणे गरजेचे आहे. 

Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या; मुंबई, पुण्यातील तरुणांना भरघोस पगार मिळवण्याची संधी

अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे आवश्यत आहे. येताना नोकरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार कार्यालयाकडे राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

सणासुदीच्या दिवसांसाठी टपाल विभागाची खास ऑफर, नाममात्र शुल्कात मिळणार 'ही' खास सुविधा

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More