मोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले

सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2018, 08:19 PM IST
मोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले title=

मुंबई : सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी भाजपाला जोरदार चिमटा काढलाय. २०१४ मधील निवडणुकीचे जुमले २०१९ मध्ये चालणार नाहीत. मोदी लाट ओसरणार असल्याचे त्यांनी म्हटलेय.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्राला 'दिल्लीच्या ड्रेसिंगरूममधील चर्चा' हे शीर्षक दिलेय. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह एकमेकांबरोबर चिंतेत चर्चा करत असल्याचे दाखवले आहे. अमित शाह यांच्या हातात चेंडू असून त्यावर २०१४ चे जुमले असे लिहिलेले आहे. अमित शाह मोदींना म्हणतायत, गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिसपेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना २०१९ मदी स्विंग होएलसं वाटात नाय !, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x