दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...

  मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केलंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 19, 2017, 08:09 PM IST
 दिवाळीच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदी-शाहांवर फटकारे...  title=

मुंबई :  मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केलंय. 

यावेळी मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही राज यांनी कुंचल्याच्या माध्यमातून फटकारले आहे.   

लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर आपल्या व्यंग्यचित्राच्या माध्यमातून निशाणा साधलाय...

तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले असले तरी कृष्णकुंजवर दिवाळीचा उत्साह कायम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी- कार्यकर्ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'कृष्णकुंज'वर आले. 

यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला आणि चिरंजीव अमित यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि अमितसोबत सेल्फीची हौसही भागवून घेतली.