मुंबई : फेरिवाल्यांविरूद्ध मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी आज (शनिवावर) मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पण, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची केलेली नक्कल. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या काहीच तास आगोदर नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांच्या बाजूने राग आळवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांचा समाजार घेतला.
नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांच्या बाजूने बोलताना फेरिवाला गरीब असतो. भाकरीसाठी कष्ट करणाऱ्या फेरिवाल्यांच्या पोटावर पाय का देता. असा सवाल विचारत नाना पाटेकरांनी आपण त्यांना समजून घ्यायला हवे, असे म्हटले आहे. यावर राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांबद्दल शेलके शब्द वापरत आपली भावना भाषणातून व्यक्त केली. आपल्या भाषणात राज ठाकरे काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.