राज्यसभेसाठी अपक्षांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपचा दबाव - संजय राऊत

Rajya Sabha elections - Sanjay Raut's serious allegations against BJP : राज्यसभा निवडणुकीत मोठी चुसर निर्माण झाली आहे. आता ED-CBI कडून भाजपाकडून अपक्षांवर दबाव आणला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Updated: Jun 4, 2022, 11:39 AM IST
राज्यसभेसाठी अपक्षांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून भाजपचा दबाव - संजय राऊत title=
संग्रहित छाया

मुंबई : Rajya Sabha elections - Sanjay Raut's serious allegations against BJP : राज्यसभा निवडणुकीत मोठी चुसर निर्माण झाली आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपनेही आपला उमेदवार उतरवला आहे. मात्र, आता ED-CBI कडून भाजपाकडून अपक्षांवर दबाव आणला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभा बिनविरोध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा निष्फळ ठरला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजुनी ताकद पणाला लावली जाण्याची शक्यता आहे. यावरुन दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

 राऊत म्हणाले, राज्यसभेसाठी अपक्षांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. अपक्षांना प्रलोभनं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. अपक्ष कुणासोबत आहेत ते 10 जूनला स्पष्ट होईल. आत्तापासून पत्ते पिसू नका, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. भाजपनं उगाच पैसे वाया घालवू नये, असे राऊत म्हणाले. राज्यसभेच्या चारही जागा महाविकासआघाडीच जिंकणार असा दावा संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषे दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरुन काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत, असे  संजय राऊत म्हणाले.