गोल्डलोन घेणाऱ्यांना मोठी ऑफर, 'आरबीआय'च्या निर्णयामुळे हा फायदा नक्की

रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्यावर गेलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी गुरूवारी व्याज दरात कोणताही बदल केला नाही.

Updated: Aug 6, 2020, 07:10 PM IST
गोल्डलोन घेणाऱ्यांना मोठी ऑफर, 'आरबीआय'च्या निर्णयामुळे हा फायदा नक्की title=

मुंबई : रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्यावर गेलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी गुरूवारी व्याज दरात कोणताही बदल केला नाही. मात्र दुसरीकडे परिवारात गोल्डलोन घेणाऱ्यांसाठी गोल्डलोनच्या कर्जाची मर्यादा ७५ टक्क्यांवरून ९० टक्के केली आहे. म्हणजेच सोनं गहाण ठेवून तुम्हाला गोल्डलोन घ्यायचं असेल तर त्या बदल्यात ९० टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकणार आहे. 

या आधी ही मर्यादा ९० टक्के होती. ग्राहक ३१ मार्च २०२१ पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रिझर्व्ह बँकेची गुरूवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, एमपीसीने रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोने गहाण ठेवून घेतल्या जाणाऱ्या गोल्डलोनची मर्यादा ७५ टक्क्यांवर ९० टक्के केली गेली आहे. एवढंच नाहीतर कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्याने, अर्थव्यवस्थेवर देखील वाईट परिणाम झाला आहे. 

यामुळे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मध्यम आणि लघु उद्योगाच्या कर्जाच्या पुर्नरगठनास देखील आरबीआयने मंजुरी दिली आहे.