मुंबई: झी एन्टरटेनमेन्ट (Zee Entertainment) बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत काही दिवसांपूर्वी विलीनीकरणाचा निर्णय घेतला. तेव्हापासून Invesco च्या हेतूवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. या दरम्यान वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.काही मीडिया रिपोर्टने यासंदर्भात कोणतंही तथ्य न तपासता वृत्त दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर इन्वेस्कोने यासंदर्भात NCLT कडे याचिका दाखल केली. NCLT ने इन्वेस्कोची बाजू जाणून घेतली. मात्र या संदर्भात अजून कोणताही आदेश देण्यात आलेले नाही.
NCLT ने असा कोणताही आदेश दिलेला नाही.इनवेस्कोची झी एंटरटेनमेंटमध्ये भागीदारी आहे. या इनवेस्कोने अपिल केलं आहे. या अपिलवर NCLT कडून अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. झी एंटरटेनमेंट बोर्ड भागधारकाचं हित लक्षात घेऊन योग्यच निर्णय घेईल. 4 ऑक्टोबरला पुन्हा एकदा या याचिकेवर NCLT समोर सुनावणी होणार आहे.
ZEEL बोर्डाचं अधिकृत निवेदन
NCLT च्या सुनावणीनंतर ZEEL बोर्डाने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध जारी केलं. या निवेदनानुसार,"कंपनीची एजीएम अर्थात बैठक ही (extraordinary general meeting) निर्धारित वेळीच होईल. तसेच भागधारकाचं हित लक्षात घेत योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने अचूक पाऊलं उचलली जातील", अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली.